मयुरी चौधरी हिची सीए होण्याची इच्छा
एरंडोल – तालुक्यातील जवखेडेसिम येथील रहिवाशी व रिक्षा चालक अनिल भावलाल चौधरी यांची मुलगी मयुरी अनिल चौधरी हि नुकत्याच उच्च माध्यमिक विभागातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत एरंडोल येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आली आहे.मयुरीने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
एरंडोल तालुक्यातील जवखेडेसिम येथील अनिल चौधरी हे गेल्या बारा वर्षांपासुन रिक्षा चालकाचा व्यवसाय करीत असुन मयुरीची आई देखील गावातील शेतात मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे.अशा या अत्यंत प्रतिकुल परीस्थित लढा देत मयुरीने अभ्यासावर लक्ष केंद्रित करून बारावीच्या परीक्षेत ८०.२९ टक्के गुण मिळवुन पाटील महाविद्यालयातील तिन्ही शाखेतुन प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकाविला आहे.यामुळे संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील,प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील,उपप्राचार्य एस.एच.पाटील,पर्यवेक्षक नरेंद्र गायकवाड व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.मयुरीने भविष्यात सी.ए.होण्याची इच्छा व्यक्त केली. यशा बद्दल आई वडील यांना श्रेय दिले असुन त्यांचे मला मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सांगुन भविष्यात त्यांच्या साठी काही करण्याचा मानस बोलुन दाखवला आहे.