एरंडोल-पारोळा मतदारसंघातुन शिवसेनेकडुन चिमणराव पाटील यांना एबी फॉर्म

0

जळगाव – जिल्ह्यातील एरंडोल-पारोळा मतदारसंघातु शिवसेनेकडुन माजी आमदार तथा तापी महामंडळाचे उपाध्यक्ष चिमणराव पाटील यांना आज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते हे उपस्थित होते.
जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या एरंडोल-पारोळा या मतदारसंघातुन राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ. सतीश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काल शिवसेनेतर्फे विद्यमान आमदारांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला. चिमणराव पाटील यांना एबी फॉर्म न मिळाल्याने मतदारसंघासह जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान काल दि. २९ रोजी रात्री १०.३० वा. मातोश्रीहुन चिमणराव पाटील यांना बोलावणे आले होते. त्यानुसार आज शिवसेना नेते माजी आ. चिमणराव पाटील यांनी मातोश्री येथे जाऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. याप्रसंगी उध्दव ठाकरे यांच्या हस्ते चिमणराव पाटील यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते उपस्थित होते. पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्यानंतर माजी आ. चिमणराव पाटील यांनी फॉर्म शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब यांच्या खुर्चीवर ठेऊन वंदन केले. दरम्यान आता एरंडोल-पारोळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आ. डॉ. सतीश पाटील व शिवसेनेतर्फे चिमणराव पाटील यांच्यात लढत निश्‍चीत झाली आहे.