पाचोरा :- आज देशात अदानी व अन्य दोन चार लोकांची संपत्ति बेसुमार वाढत असून कित्येक लोक आपल्या दैनंदिन गरजा पैसा नसल्याने भागउ शकत नाही , देशात कधी नव्हे एवढी आर्थीक विषमता निर्माण झाली आहे , ही बाब लोकशाहीस घातक आहे असे प्रतिपादन प्रख्यात पर्यावरणवादी व आदिवासी नेत्या मेघाताई पाटकर यांनी केले .
एस. एम . जोशी सोशलिस्ट फाउंडेशन द्वारा पाचोरा येथील गो . शे . हायस्कूल मध्ये ‘ सामाजिक न्याय व सलोखा ‘ परिषद दिनांक १ मे रोजी आयोजित करण्यात असता अध्यक्षस्थानावरुन भाषण करत असता मेघाताई बोलत होत्या .
मेघाताई पाटकर यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की , देशात आदिवासी समाज आपल्या न्याय , हक्का करीता सातत्याने संघर्ष करीत आला आहे , आजही या समाजात भूकब
ळी , अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे , त्यांचेत शिक्षणाची कमतरता आहे , या समाजात रोजगार नसल्याने आर्थिक दारिद्रय आहे .
प्रसिद्ध साहित्तीक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी आज भारतात सामजिक न्याय ही संकल्पना केवळ संविधानात दिसते , प्रत्यक्षात ‘ समाजाकड पाहुन न्याय ‘ ही संकल्पना रजत असल्याचे दिसत आहे . पुरोगामी संघटना केवळ कुणाला मोठे वा छोटे करण्यात आपली शक्ती खर्च करुन आपलेच अस्तित्व खलास करीत आल्या आहेत , एकेकाळी ज्या विचारधारेच्या विरोधात आम्ही लढत होतो आज त्याच विचारधारेच्या संघटनांशी आम्ही मैत्री करतो हे असेच चालत राहिले तर या देशात कधीच सामाजिक न्याय , सामाजिक लोकशाही निर्माण होउ शकणार नाही .
संयोजक सुभाष लोमटे यांनी देशातील सामाजिक , आर्थिक , राजकीय परिस्थिती कीती भयावह आहे हे सविस्तरपणे मांडले .
प्रसिद्ध समाजवादी विचारवंत प्रा . शेखर सोनाळकर यांनी आज परशुरामला आदर्श पुरुष म्हणून पुढं करुण देशात दहशत निर्माण केली जात आहे , धर्मान्धता , जातीयता हैदोस घालत आहे , खून , मारामारी प्रतिष्ठेचे झाले आहे असे सांगितले .
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील यांनी सामाजिक न्याय , सामाजिक सलोखा ही तत्वे अधिक घट्ट करणे गरजेचे आहे असे सांगितले . म्हस्के वकील यांचेही भाषण झाले .
सुरवातीस खलील देशमुख यांनी प्रास्ताविकपर भाषणात देशातील दलित , आदिवासी , मुस्लिम , कष्टकरी , ग्रामीण लोकांचे जीवनमान कश्या प्रकारचे आहे , सामाजिक सलोखा कसा कमी कमी होत आहे , लोकशाही मुल्यांचा कसा विसर पडत आहे याची माहिती दिली .
या परिषदेत खान्देशातिल विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा मान्यवारांचा सन्मानचीन्ह देऊन सत्कार करण्यात आला .
सूत्रसंचालन प्रा . विकास पाटील यांनी तर जय वाघ यांनी आभार प्रदर्शन केले .कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता आनंद नवगिरे , प्राचार्य बी. एन. पाटील , रणजीत पाटील , एडव्होकेट अविनाश भालेराव , फिरोज खान , इमरान खान , देवीदास पाटील यांनी परिश्रम घेतले . परिषदेस विविध भागांमधून स्त्री पुरूष मोठ्या संखेने हजर होते .