इ.१० वी बोर्ड निकालात इंदिराबाई ललवाणी शाळेच्या विद्यार्थिनींचा शिरपेचात मानाचा तुरा ; हर्षदा पाटील जामनेर तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान
जामनेर प्रतिनीधी l
जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयातील 10 वी निकाल 98.01 टक्के निकाल यात
हर्षदा अविनाश पाटील ने ९७.२० टक्के मिळूवन तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला,तर
द्वितीय क्रमांक- साक्षी राजाराम उगले ९६.६० टक्के
तृतीय क्रमांक – दिव्या सुनील सोनवणे ९६ टक्के
चतुर्थ क्रमांक- प्रांजल संजय पाटील ९५.२० टक्के
पाचवा क्रमांक – राणी गोकुळ तायडे ९४.८०टक्के
९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले एकूण विद्यार्थी २९ तर विशेष गुण प्राप्त विद्यार्थी १६१ आहे.
यात विद्यालयातून ४०६ विद्यार्थी प्रविष्ट होते त्यातून ३९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, शाळेचा एकूण ९८.०१ टक्के निकाल लागला असून शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
वरील सर्व विद्यार्थ्यांचे इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे आधारस्तंभ माजी खासदार ईश्वरलालजी जैन, संस्था अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, उपाध्यक्ष विनीत महाजन, संचालक फकीरा काका धनगर, संचालक श्रीराम नाना महाजन, माजी मुख्याध्यापक जे पी पाटील यांनी अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपमुख्याध्यापक एस एन चवरे, पर्यवेक्षक पी पी चौधरी, पर्यवेक्षक व्ही जी महाजन, व शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींचे मार्गदर्शन लाभले.