शिंदखेडा येथील एव्हरशाईन इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये कलर डे रंगोत्सव सप्ताह उत्साहात साजरा

शिंदखेडा (प्रतिनिधी) :– येथील एव्हरशाईन इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये कलर डे सप्ताह साजरा करण्यात आला. सोमवार रोजी लाल, मंगळवार निळा , बुधवार पिवळा व नारंगी, गुरुवार हिरवा, शुक्रवार गुलाबी, सोमवार पांढरा व काळा अशा विविध रंगाचा वापर करून त्या त्या दिवशी सर्व विद्यार्थ्यी ,शिक्षक ,शिक्षीका यांनी रंगाचे कपडे व विविध वस्तू तसेच साहित्य बनवून संपुर्ण शाळेचे वातावरणात रंगमय फुलवत केले . सुरुवातीला संस्थेचे चेअरमन शाजी वर्गीस , मुख्याध्यापिका रिना शाजी यांनी रंगोत्सव सप्ताहाचे वृक्षारोपण करुन उद्घाटन केले. सप्ताह यशस्वी करण्यासाठी मीना पाटील, संध्या भामरे, माया राजेश, रिना वाघवा , जागृती कचवे , स्वाती सुतार, आदित्या राकेश माया देसले, मनिषा वसईकर , शरद ठाकुर, आरिफ पिंजारी यांनी परिश्रम घेतले.