निवडणूकीच्या वेळी माझ्या विरोधात सर्व एकत्र होतात – आ . खडसे

वरणगांवात बाजार समितीच्या प्रचारार्थ मेळाव्याला माजी . संतोष चौधरी, अॅड. रविंद्रभैय्या पाटील यांची उपस्थिती

वरणगांव । प्रतिनिधी कुठल्याही प्रकारच्या निवडणूका असल्याकी विरोधक माझ्या विरुद्ध षडयंत्र रचून एकत्र येतात . मात्र, मतदारांचा माझ्यावर विश्वास असल्याने आमचा विजय निश्चीत असतो त्त्याचप्रमाणे बोदवड बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचाच विजय होईल असे मत आ . एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले . बोदवड बाजार समितीच्या निवडणूकी निमीत्त वरणगांवला आयोजित मेळाव्यात त्यांनी आपले विचार व्यक्त केले .

कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवडच्या निवडणूक प्रचारार्थ मतदार आणि कार्यकर्त्यांच्या स्नेहभेट मेळाव्याचे भाग्य लक्ष्मी लॉन वरणगांव येथे माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या प्रमुख उपस्थिती होती .यावेळी मेळाव्यास उपस्थित राहून मतदार बंधु भगिनींना राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले . मेळाव्याला माफदा राज्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वरभाऊ रहाणे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील सर, बोदवड तालुकाध्यक्ष आबाभाऊ पाटील,भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे , जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी , सुधाकर जावळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आ. एकनाथराव खडसे यांनी फडणवीस सरकारमुळे शेतकरी हवालदिल झाला असुन सरकार अयोध्या व आसामचे दौरे करून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सांगितले . मेळाव्याचे सुत्रसंचलन व आभार वाय. आर . पाटील सर यांनी व्यक्त केले .