कर्नाटक सरकारला धोका नाही; भाजपचे प्रयत्न असफल ठरतील: सिद्धरामैया

0

बंगळूर: कॉंग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी राजीनामा दिल्याने कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस सरकार अल्पमतात येण्याचे चिन्ह आहे. दरम्यान यामागे भाजपचे षडयंत्र असून भाजप त्यात यशस्वी होणार नाही. कर्नाटकमधील सरकार अस्थिर करण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे, मात्र सरकार स्थिर आहे. सरकारला कोणताही धोका नाही असा दावा माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस नेते सिद्धरामैया यांनी व्यक्त केला आहे.

जवळपास १३ आमदारांनी राजीनामे दिले असून त्यावर मंगळवारी विचार होणार आहे. राजीनामा दिलेले आमदार मुंबईत एका हॉटेलमध्ये थांबून आहे.