नवी दिल्ली: उद्या १७ व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. उद्या दुपारपर्यंत निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट होतील. दरम्यान विरोधकांकडून ईव्हीएम मशीनवर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर शंका घेण्यात आली आहे. ईव्हीएम मशीन म्हणजे भाजपची ‘इलेक्ट्रॉनिक व्हिक्टरी मशीन्स’ असल्याचे आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. कॉंग्रेस नेते अभिषेक मनु संघवी यांनी निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर शंका घेतली आहे. निवडणूक आयोग हे मोदी प्रचार आयोग म्हणून काम करत आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
निवडणुकीचे एक्झिट पोल प्रसिद्ध झाले आहेत, त्यामध्ये एनडीएला बहुमत दाखविण्यात आले आहे. त्यानंतर विरोधकांकडून ईव्हीएमच्या नावाने बोंब सुरु झाली आहे.