नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा विरोधी पक्षांना दणका दिला आहे. विरोधी पक्षांची व्हीव्हीपॅटमधील ५० टक्के चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी पुन्हा एकदा फेटाळली आहे. निवडणूक आयोगाने दिलेला हा निकाल विरोधी पक्षांना एक चपराक आहे असे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे. व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या मोजणीत काहीही बदल होणार नसल्याचे आयोगाने म्हटले आहे.
निकालाला काही तास बाकी असताना निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याने विरोधी पक्षाना मोठा झटका दिला असे बोलले जात आहे. आज निवडणूक आयोगाने या विषयावर तातडीची बैठक घेतली.. या बैठकीत विरोधकांची मागणी फेटाळण्यात आली आहे. व्हीव्हीपॅटमधील किमान ५० टक्के चिठ्ठ्यांची ईव्हीएमसोबत मोजणी करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. त्या अगोदर सुप्रीम कोर्टानेही ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमध्ये काही छेड झाली नसल्याचे सांगत विरोधी पक्षांना एका विषयावर किती वेळा सुनावणी घेण्यात यावी असा प्रश्न उपस्थित करत त्यांची मागणी फेटाळली होती.