माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना विहिंपचे निमंत्रण

0

नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारल्याची देशभर चर्चा सुरू आहे. ही बाब ताजी असतांना माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना विश्व हिंदू परिषदेने शिकागो येथील एका संमेलनाचे निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो यात्रेला १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विहिंपतर्फे शिकागो येथे विश्व हिंदू काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत, धर्मगुरू दलाई लामा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेअर व अमेरिका काँग्रेस सदस्य तुलसी गबार्ड सहभागी होणार आहेत. आपण कार्यक्रमाला येण्याचा प्रयत्न करू, असे उत्तर राजन यांनी दिल्याचे एका आयोजकाने सांगितले आहे. राजन रिझर्व बँकेचे गव्हर्नर असताना विहिंपची मातृ संस्था असलेल्या संघाद्वारे त्यांच्या धोरणांवर प्रचंड टीका करण्यात आली होती. २०१६ मध्ये आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राजन शिकागो येथे अध्यापनाचे काम करत आहेत.