शिरूर : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या कारचा शिरुरजवळ भीषण अपघात झाला. शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास शिरुरजवळील कानीफनाथ फाटा परीसरातील हॉटेल सदगुरू वडेवाले येथे हा भीषण अपघात झाला. पाचपुते यांची कार एका ट्रकला धडकली. यात कारच्या समोरील बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचुर झाला आहे. परंतु, नशीब बलवत्तर म्हणून बबनराव पाचपुते यांना कुठलीही इजा झालेली नाही.