नवी दिल्ली-माजी पतंप्रधान मनमोहन सिंग यांची राजस्थानमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचा कार्यकाळ 3 एप्रिल 2024 असणार आहे. काँग्रेस नेते महेश जोशी यांना मनमोहन सिंग यांच्या निवडीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. दरम्यान,राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्टिट करुन घोषणा केली.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मदन लाल सैनी यांचे निधन झाल्याने रिक्त असलेल्या जागेवर त्यांची निवड झाली.
काँग्रेसचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना राजस्थानातून राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याचे स्पष्ट होताच भाजपाने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.मनमोहन सिंग हे काँग्रेसकडून गेल्या तीन दशकांपासून आसाममधून राज्यसभेवर निवडून आले आहेत. यंदा त्यांनी पहिल्यांदाच राजस्थानातून राज्यसभेची निवडणूक लढवली आणि बिनविरोध निवडून आले.