कुठल्याही शैक्षणिक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय कार्यालय व न्यायालय यांच्यासमोर दाखल करायचा प्रतिज्ञापत्रावर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ :- दुय्यम निबंधक अधिकारी संदीप पाटील
इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयात महसूल सप्ताह साजरा..!
जामनेर:– महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगाव व महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग तर्फे आयोजित जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्राद्वारे महसूल दिन दि. १ ते ७ ऑगस्ट ” महसूल सप्ताह” आज दुपारी १ वा. इयत्ता ११ वी कला, वाणिज्य विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले
या सप्ताह प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक दुय्यम निबंधक अधिकारी संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, व इतर शैक्षणिक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तसेच शासकीय कार्यालय व न्यायालय यांचे समोर दाखल करायचे इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे,
तसेच याप्रसंगी दुय्यम निबंधक कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक स्वाती पाटील, विलास चौधरी, गौतम इंगळे, संदीप सुरवाडे आदी. कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.के एन मराठे यांनी केले तर समान संधी केंद्र समन्वयक प्रा.समीर घोडेस्वार यांनी शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना, कार्यक्रमाविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक एस आर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.विजय पाटील, प्रा.सुमित काबरे, प्रा.जे आर पाटील, प्रा.माधुरी तायडे यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे समान संधी केंद्र समन्वयक प्रा समीर घोडेस्वार यांनी केले.
————————————-
🔴फोटो कॅप्शन:- विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन करताना दुय्यम निबंधक अधिकारी संदीप पाटील, सोबत स्वाती पाटील,उपप्राचार्य प्रा के एन मराठे, समान संधी केंद्र समन्वयक प्रा समीर घोडेस्वार