एक्झिट पोल आणि प्रत्यक्ष निकालामध्ये जमीन आसमानचा फरक असेल: चंद्राबाबू नायडू

0

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक काल संपली असून, त्याचे निकाल येत्या २३ में ला लागणार आहे. त्यापूर्वी देशातल्या सगळ्या प्रसारमाध्यमांनी भाजप प्रणित युतीला बहुमत मिळणार असल्याचे चित्र एक्झिट पोल मधून दाखवण्यास सुरुवात केली आहे. या निकालापूर्वी प्रादेशिक पक्षांनी आपली भूमिका प्रसिद्ध करणे टाळले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि तेलगु देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी देशातील सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. एक्झिट पोलच्या निकालामध्ये आणि प्रत्यक्ष निकालामध्ये जमीन आसमानचा फरक असेल असे विधान चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे.

२०१९च्य लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची आघाडीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी गेल्या काही दिवसापासून अरविंद केजरीवाल, कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. लवकरच ते निकालाच्या समीकरणाबाबत ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार आहेत.

दुसरीकडे भाजपला सत्तेपासून दूर कसे ठेवता येईल याचा आराखडा शरद पवार आखत आहे. ओडीशातील प्रादेशिक पक्ष बिजू जनता दल, आणिआंध्रप्रदेश मधील वायएसआर कॉंग्रेस पक्षाने आपले पत्ते उघड केले नाही. मोदी सरकारने फनी चक्रीवादळात केलेल्या कामाची पावती ओडिशा सरकारने दिली होती. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाइक आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या संपर्कात शरद पवार आहे. देशातील सगळे विरोधी पक्ष एक झाले तर नक्कीच भाजपला शह देऊ शकतात असा विश्वास दोन्ही नेत्यांना वाटतआहे.