एक्झिट पोलचा निकाल अमान्य:कमलनाथ

0

नवीदिल्ली: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळत असल्याचे चित्र एक्झिट पोल मधून पाहण्यात मिळत आहे. ह्या एक्झिट पोलच्या आकड्यावर कॉंग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गेल्या काही राज्यात झालेल्या निवडणुकीत एक्झिट पोलमध्ये कॉंग्रेसचा पराभव होणार असल्याचे चित्र दाखवण्यात आले होते, पण त्याचा निकाल काय लागला याचे चित्र सगळ्यासमोर आहे. या एक्झिट पोलचा निकाल आम्हाला अमान्य असल्याचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्वीट केले आहे.

या एक्झिट पोलच्या निकालामुळे कॉंग्रेस मध्ये खळबळ माजली आहे.कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांना एक्झिट पोलचा निकाल मानण्यास नकार दिला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, २००४ मध्ये, तसेच २०१८मध्ये एक्झिट पोल दाखवण्यात आले होते त्यामध्ये कॉंग्रेसचा पराभव होईल असे दाखवण्यात आले होते पण त्याचा परिणाम उलटा झाला, त्यामुळे २३ में पर्यंत वाट पहावी असा सल्ला त्यांनी या ट्वीट द्वारे दिला आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या जागांमध्ये वाढ होईल आणि भाजपाच्या आश्वासनाचा बुरखा फाटेल असा त्यांनी विश्वास त्यांनी व्यक्त केला.