मुंबई: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासा दरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा ड्रग कनेक्शन आढळल्याने तिला आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला अटक करण्यात आलेली आहे. सध्या दोन्ही बहिण-भाऊ न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान दोघांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाने २० ऑक्टोंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढविली आहे. त्यामुळे रिया आणि शोविक चक्रवर्तीला दिलासा मिळालेला नाही.
Special NDPS Court extends judicial custody of Rhea Chakraborty, Showik Chakraborty and others till 20th October. #SushantSinghRajputDeathCase
— ANI (@ANI) October 6, 2020
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री सुशांतची प्रेयसी रियाला सुशांतच्या कुटुंबीयांनी जबाबदार धरले आहे. त्याची चौकशी झाली, त्यात ड्रग प्रकरणात ती अडकली. सुशांत ड्रग्स घेत होता, परंतु मी घेतले नाही असे रियाने सागितले आहे. मात्र तिचे ड्रग्स प्रकरणात कनेक्शन आढळल्याने तिला अटक करण्यात आली आहे.