फेसबुकने वापरकर्त्यांसाठी आणले ‘डाउनवोट’चे फिचर

0

सॅन फ्रान्सिस्को – फेसबुक त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नवीन फिचर आणण्याच्या विचारात आहे. यापुढे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवता येणार आहे. ‘डाउनवोट’ असे या नवीन फिचरचे नाव आहे. मात्र हे बटण डिसलाईक नसून त्याच्याशी मिळतेजुळते असल्याचे फेसबुककडून सांगण्यात आले आहे. हे बटण दाबल्यानंतर ज्याने कमेंट केली, त्याच्यासाठी टिप्पणी लपविली जाते, नंतर ही टिप्पणी आक्षेपार्ह, दिशाभूल करणारी किंवा विषयबाह्य होती का? असे वापरकर्त्यास विचारता येणार आहे.

फेसबुकने यावर्षी फेब्रुवारीमध्ये या बटणाचे परिक्षण केले आहे. यापाठीमागे सामाजिक माध्यमांवरील माहितीची गुणवत्ता वाढण्याचा हेतू असल्याचे फेसबुकने सांगितले, अशी माहिती नेक्स्ट वेबने दिली आहे. यापूर्वी २००९ मध्ये फेसबुकने लाईकचे बटण आणले होते. लोकांच्या फोटो, माहिती आणि संदेशावर आपली चांगली प्रतिक्रिया देण्यासाठी हे बटण आणण्यात आले होते. आता चुकीची माहिती आणि चुकीच्या संदेशासाठी हे डाउनवोट बटण आणण्यात आले आहे.