मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गज नेते आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करणार आहेत. बंडाच्या भीतीणजे नाव जाहीर न केलेल्या काही उमेदवारांना शेवटच्या क्षणी अर्ज भरण्याचा आदेश दिला जाऊ शकतो. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे.
नागपूरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जोरदार शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल करणार आहे. बारामतीतून अजित पवार तर येवल्यातून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ अर्ज भरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. मुख्यमंत्री यांच्याविरोधात भाजपातून आलेले माजी आमदार आशिष देशमुख रिंगणात आहेत.
दरम्यान भाजपने चौथ्या यादीतून माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार राज पुरोहित, माजी मंत्री प्रकाश मेहतांना डच्चू दिला आहे. तर माजी मंत्री खडसे यांना थोडासा दिलासा मिळाला आहे, त्यांची कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.