मुंबई: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी देशातील आर्थिक मंदीवर भाष्य केले आहे. भाजपने आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी डबल इंजिन मॉडेल आणले, त्यावरून मते मागितली. मात्र सत्तेत आल्यानंतर भाजप सरकार आर्थिक आघाडीवर अपयशी ठरली असल्याचे आरोप करत डॉ.मनमोहन सिंग यांनी महाराष्ट्रातील उत्पादन वाढीचा दर सलग चौथ्या वर्षी घातल्याचे सांगितले. डॉ.मनमोहन सिंग मुंबई दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले. आर्थिक मंदीच्या झळा महाराष्ट्रालाही पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. मनमोहन सिंग यांनी यावेळी मुंबईतील पीएमसी बँकेच्या दिवाळखोरीवर देखील भाष्य केले. पीएमसी बँकेच्या बाबतीत जे घडले ते अतिशय दुर्दैवी असून सरकारने यातून मार्ग काढून ठेवीदारांना न्याय द्यावा यासाठी मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचेही डबल डॉ.मनमोहन सिंग यांनी सांगितले.