अमरोहा: काल विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अफगाणिस्तानवर निसटता विजय मिळविला. या विजयात महत्त्वाची भूमिका राहिली ती गोलंदाज मोहम्मद शमीची. त्याने चार गडी बाद केले. त्यात त्याने शेवटच्या षटकात लागोपाठ 3 विकेट घेत हट्रीक केली. दरम्यान आज मोहम्मद शमीच्या कुटुंबीयांनी आणि मित्र परिवारांनी उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे जल्लोष साजरा केला. पेढे वाटप करून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.