ए. टी.झांबरे विद्यालयातील विद्यार्थ्यांना दिला निरोप

जळगाव – ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व शुभेच्छा समारंभ झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून के.सी.ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर होते. त्यांनी उपस्थित मुलांना केवळ परीक्षार्थी न होता खऱ्या अर्थाने संशोधक, यशस्वी विद्यार्थी, आदर्श नागरिक व्हा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्रास्ताविक ए. एन. पाटील यांनी केले. धनश्री रोकडे, अथर्व ब्रह्मक्षत्रिय, प्रणाली नारखेडे, कुणाल पाटील, मानसी खैरनार, सृष्टी महाजन, मानसी पाटील आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षकांच्या वतीने वर्षा चौधरी यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक नरेंद्र पालवे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पूनम कोल्हे यांनी केले. तर आभार वेद्प्रकाश् गाडदे यांनी मानले.