राज्यभर मोफत दूध वाटणार!

0

मुंबई:- दुधाचे भाव आज अत्यंत न्यूनतम पातळीवर येऊन पोहचले आहेत. दुध दरात दहा रुपयांचा तोटा शेतकरी सहन करत आहेत. दररोज होणारा हा असह्य तोटा आता सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे. सरकारने जाहीर केलेला भाव नाकारून शेतक-यांची अक्षरशः लुट सुरु आहे. यांच्या निषेधार्थ दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या अंतर्गत राज्यभरातील शेतकरी संघटनांना एकत्र आणून या प्रश्नावर राज्यव्यापी संघर्ष उभा करण्याचा निर्णय अहमदनगर येथील बैठकीत घेण्यात आला आहे. दुधाला मिळणाऱ्या कमी भावाच्या निषेधार्थ दिनांक 3 ते 9 मे या सप्ताहात राज्यभर मोफत दूध वाटप करत राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतला असल्याचे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

दुधाच्या धंद्यात सातत्याने होणारी ही लुटमार असह्य झाल्याने “लुटता कशाला आता फुकटच न्या” या शब्दात संताप व्यक्त करत औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा गावाने तर याच संतापातून सरकारला दुध फुकट देण्याचा ग्रामसभेत ठरावच केला आहे. औरंगाबाद, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, पुणे, सोलापूर जिल्ह्यातही असेच ठराव करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
दुध उत्पादक ठिकठीकाणी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत डॉ. अजित नवले यांनी दिली.

विविध संघटनांकडून दुध प्रश्नावर सुरु असलेल्या आंदोलनात समन्वय साधण्यासाठी दिनांक २८ एप्रिल रोजी सांगली येथून दुध उत्पादक जिल्ह्यांचा दौरा सुरु करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या अंतर्गत २८ एप्रिल रोजी सांगली, २९ एप्रिल रोजी कोल्हापूर व ३० एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यात दुध उत्पादकांचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. उर्वरित दुध उत्पादक जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारे मेळावे घेऊन संघर्ष व्यापक करण्यात येणारअसल्याचे नवले म्हणाले.