अहमदनगर – जिल्हातील नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारी येथे एका शेतकर्याने आत्महत्या केली आहे.
जाकीर शब्बीर शेख असं या ४० वर्षीय मयत शेतकर्याचं नाव आहे. बुधवारी रात्री २-३ वाजेच्या सुमारास जाकीर यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
जाकीर शेख यांच्या मागे त्यांच्या कुटुंबात मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. जाकीर यांनी शेतीसाठी जवळपास ५ लाख रुपयांचं कर्ज घेतलं होत. कर्जामुळेच जाकीर यांनी आत्महात्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.