शेतकऱ्यांच्या जमीनी सरकार आता सक्तीने संपादन करणार! 

0
सरकारच्या अध्यादेशास धनंजय मुंडेंचा कडाडून विरोध
प्राण गेले तरी बेहत्तर, शेतकऱ्यांच्या एक इंचही जमीनीला हात लावू देणार नाही – मुंडे
मुंबई :-  राज्यातील महामार्गासाठी आता शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या सहमती शिवायही ताब्यात घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी सरकारने मागील आठवड्यात झालेल्या (7 मे रोजी ) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा अध्यादेश काढला आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. धनंजय मुंडे यांनी या अध्यादेशाला  कडाडून विरोध केला आहे.
सरकार असा तुघलकी निर्णय घेऊच कसं शकते ? हा कायदा आम्ही कदापिही सहमत होऊ देणार नाही, शेतकऱ्यांच्या सहमती शिवाय त्यांची एक इंचही जमीन मी ताब्यात घेऊ देणार नाही त्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. याबाबत त्यांनी एक ट्विट केले असून त्याला सदर अध्यादेशाची प्रत जोडली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना ही त्यात टॅग केले आहे.