जिल्ह्यातील ११ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे प्रस्ताव मंजूर

0

जळगाव – आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचे ११ प्रस्ताव आज जिल्हास्तरीय समितीने मंजूर केले असुन या शेतकर्‍यांच्या कुटूंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतुन आर्थिक मदत दिली जाणार आहे.
शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यात जिल्ह्यातील १४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांपैकी ११ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, कृषी अधिक्षक संभाजी ठाकुर, पोलिस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले आदी उपस्थित होते. २०१८-२०१९ या वर्षातील १४ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासकीय मदतीसाठी समितीपुढे आली होती.

यांचे प्रस्ताव झाले मंजूर
ज्ञानेश्वर भानुदास पाटील ( धुपे, ता. चोपडा), लहु लक्ष्मण साबळे ( आव्हाणे ता. जळगाव ), पुंजु रुपचंद कोळी ( अनवर्दे खु, ता. चोपडा ), वसंत तुकाराम पाटील ( सोनोटी ता. बोदवड), कृष्णा वामन खैरनार ( येवती ता. बोदवड), किरण नामदेव गुंजाळ ( रहिपुरी, ता. चाळीसगाव), शामकांत विनायक सुर्यवंशी ( आमोदा बु. ता. जळगाव), निना पांडु सुरवाडे ( वराड बु. ता. बोदवड), भगवान बारकु पाटील (सावखेडे होळ, ता. पारोळा), प्रभु देवचंद भील ( शिरसमणी, ता. पारोळा), समाधान युवराज पाटील ( हनुमंतखेडे, ता. पारोळा).