नेरी येथे शेतकरी तांत्रीक परिसंवाद कार्यशाळा संपन्न
शेतकऱ्यांनी मातीपरिक्षण करून पिकांना खते देण्याची गरज- तालुका कृषीअधिकारी श्री.चोपडे
जामनेर प्रतिनिधी l
इंडिकेम स्पेशालीटी फर्टीलायझर्स,पुणे आणि क्रांती ऍग्रो नेरी यांच्या संयुक्त विद्यमाने केळी,कपाशी,भाजीपाला बरोबरच इतर पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन संदर्भात शेतकऱ्यांसाठी तांत्रीक परिसंवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जामनेर तालुका कृषिअधिकारी अभिमन्यू चोपडे यांनी शेतकऱ्यांना बियाणे लागवडी पासून ते पीक हाती येई पर्यंत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशा प्रकारे करायची या विषयी सखोल मार्गदर्शन केलं.तसेच इंडिकेम कंपनीचे मार्केटिंग हेड रितेश पाटील यांनी शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न कसे घ्यावे आणि शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती कशी करावी यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले.मा.जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.तेव्हा जळके येथील प्रगतशील शेतकरी प्रशांत पाटील व नेरी दिगर येथील उद्यान रत्न पुरस्कार प्राप्त राजू पाटील यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी मा.जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे सर,तालुका कृषीअधिकारी अभिमन्यू चोपडे, राजू ढेपले ,माजी सरपंच प्रताप पाटील, डॉ. ई.आर.पाटील,या सोबतच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रांती ॲग्रो चे संचालक अनिल खोडपे, सुरेश खोडपे सर, जितेंद्र खोडपे,किशोर खोडपे सर,विवेक कुमावत,शुभम खोडपे, कंपनीचे सीनियर सेल्स एक्झिक्युटिव्ह गोविंदा पवार, मार्केटिंग ऑफिसर नरेश बडगुजर यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष दामोदर यांनी तर उपस्थित मान्यवर आणि शेतकऱ्यांचे आभार सुभाष खोडपे यांनी मानले.