शिवरायांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन; ‘फत्तेशिकस्त’चा टीझर रिलीज !

0

मुंबई:‘फर्जंद’ चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट घेऊन येत आहे. आज या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित झाला असून येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन होणार आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटातही छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. चित्रपट पाहताना शिवकालीन रोमांचकारी सर्जिकल स्ट्राईकची आठवण महाराष्ट्राला होईल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमनं व्यक्त केलाय.

चित्रपटात मृणाल कुलकर्णी, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर असे अनेक कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट-मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी सुद्धा मराठीत पदार्पण करणार आहे.