अकोला : जन्मदाता पित्याने आपल्या मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील धोतर्डी येथे घडली. विष्णू इंगळे असे या मारेकरी पित्याचे नाव आहे. विष्णूने अजय इंगळे, मनोज इंगळे आणि मुलगी शिवानी यांना मारून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. हालाखीची परिस्थितीमुळे विष्णू यांनी हि टोकाचे पाऊल उचलले असावे असे बोलले जात आहे. या घटनेनंतर गावात स्मशान शांतता पसरली आहे.