वडीलांच्या दशक्रिया विधी निमित्त वृक्षारोपण करून मुलाने वाहिली आदरांजली
शिंदखेडा – येथील अशोक सिनेप्लेक्स चे मालक रोहित राजेंद्र कौठळकर यांनी त्यांचे वडील कै.राजेंद्र कौठळकर यांच्या दशक्रिया विधी निमित्त वृक्षारोपण करून श्रध्दांजली अर्पण केली. प्रसंगी शहरातील बस स्थानकात 20 वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यात वड,पिंपळ,निंब,बकुळ हे वृक्ष लावण्यात आली कै.राजू दादा निस्सीम स्वामी भक्त होते. त्या सोबतच त्यांना वृक्षलागवड करण्याचीही खूप आवड होती. शहरातील प्रसिध्द श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात कै.राजू दादा यांनी वड,पिंपळ,उंबर या सारख्या शेकडो वर्षे ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करून घेतली आहे. त्यांच्या दशक्रिया विधी ला वृक्षारोपण करून त्यांना कौठळकर परिवाराने श्रद्धांजली वाहून समाज जागरूकतेचा संदेश देण्याचे काम केले आहे.
बस स्थानकाचे आगार प्रमुख प्रमोद चौधरी यांनी वृक्ष लागवडी साठी सहकार्य केले. लावलेल्या रोपांना बस स्थानकातून मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून , रोपांचे संगोपन करण्यात येईल असे सांगितले.
वृक्षारोपण प्रसंगी कै. राजू दादांचे भाऊ, शालक,पुतणे, जावई, नातवंड व मुलगा रोहित राजेंद्र कौठळकर सोबत मित्रपरिवार तसेच बस स्थानकाचे आगार प्रमुख प्रमोद चौधरी, मा. नगरसेवक सुनील चौधरी, वृक्ष संवर्धन समितीचे योगेश चौधरी, राजेंद्र मराठे, जीवन देशमुख, भूषण पवार, दिपक मराठे, प्रदीप चतुर्वेदी, सतीश मुळे, स्वप्नील मोरे उपस्थित होते.