वडिल मृत्युच्या दाढेत असल्याचे कळल्यानंतरही खेळला टीमसाठी

0

नायजेरिया-साखळी फेरीत खराब सुरुवात केलेल्या अर्जेंटिनाने नंतर नायजेरियावर मात करत विश्वचषकातील आपले स्थान कायम ठेवले आहे. दरम्यान या सामन्याआधी नायजेरियाचा कर्णधार मायकेल जॉन ओबी याच्यावर संकट कोसळले होते. सामना सुरु होण्याआधी मायकेलच्या वडिलांचे त्याच्या देशात अपहरण झाले. ही बातमी समजल्यानंतरही आपली जबाबदारी व देशवासियांच्या भावनांचा आदर करत मायकेलने सामना खेळण्याचा निर्णय घेतला, त्याच्या या कृतीचे सध्या सर्वच स्तरातून कौतूक केले जात आहे.

ही बातमी समजल्यानंतर मायकेल आणखी एका पेचात पडला होता. वडिलांचे अपहरण झाल्याची बातमी कोणालाही सांगितल्यास तुझ्या वडिलांना ठार मारु अशी धमकी अपहरणकर्त्यांनी मायकेलला दिली होती. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे. “वडिलांच्या अपहरणाची बातमी समजल्यानंतर काय करावं हेच मला समजतं नव्हतं. मात्र माझ्या देशातील लाखो चाहत्यांच्या अपेक्षा मी धुळीस मिळू देणार नव्हतो, त्यामुळे मी शांत राहून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. माझे जवळचे काही मित्र आणि नातेवाईक सोडले तर या घटनेबद्दल कोणालाही माहिती नव्हती.