साक्रीत घरफोडी चाळीस हजारांचा ऐवज लंपास  

0
साक्री :  व्यापाऱ्यांच्या घरी घरफोडी करून चाळीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना भांडणे ल, ता.साक्री येथे  रविवारी मध्य रात्रीच्या  सुमारास घडली.  धनंजय प्रभाकर अहिराव  (रा.भाडणे) हे  कामानिमित्त  घराला कुलूप लावून गावी गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरटय़ांनी घराच कुलूप तोडून तीस हजार रुपय किंमतीची सोन्याची दोन तोळेची माळ, सात हजार रुपये किमतीचे  पाच ग्राम सोन्याचे कानातले, तीन हजार रुपये किंमतीचे एक  ग्रामची सोन्याची अंगठी असा एकूण 40 हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी  चोरून नेला.
या प्रकरणी घरमालक धंनजय प्रभाकर अहिराव (रा.भाडणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांन विरोधात भादंवि कलम 380, 457 प्रमाणे साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जी.व्ही. झाल्टे  करित आहेत.