अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हीचे परवा लग्न

0

मुंबई :’मसान’, ‘हरामखोर’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी ही परवा 29 जूनला लग्न करणार आहे. ती बॉयफ्रेंड आणि अॅक्टर-रॅपर चैतन्य शर्मासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. कपलचे प्री-वेडिंग फंक्शन सुरु झाले आहेत. आज तिची मेंदी सेरेमनी पार पडली. सोमवारी श्वेताची बॅचलरेट पार्टी झाली. यामध्ये तिने फ्रेंड्ससोबत एन्जॉय केला. फक्त मुलींसाठी झालेल्या या पार्टीमध्ये श्वेताला सप्राइज देण्यासाठी चैतन्यही पोहोचला. चैतन्यने इंस्टाग्रामवर बॅचलरेट पार्टीचे फोटोज शेअर केले आहेत. चैतन्य श्वेतापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. चैतन्य म्हणतो की, 32 वर्षांची श्वेता खुप तरुण दिसते.

गोव्यामध्ये होणार डेस्टिनेशन वेडिंग
श्वेता आणि चैतन्यचे लग्न गोव्यामध्ये होणार आहे. आज २७ जूनला कपलची मेंदी झाली. तर ३० ला पूल पार्टी होईल. या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक सहभागी होतील. खुप कमी लोकांना माहिती असेल की, दिल्लीचे माजी चीफ सेक्रेटरी पी. के. त्रिपाठी यांच्या मुलीला बॉलिवूड अॅक्ट्रेस बनायचे नव्हते. तिला थिएटर आवडायचे, परंतू ती चित्रपटांपर्यंत पोहोचली. तिने डिज्नी चॅनलचा शो ‘क्या मस्त है लाइफ’ शॉर्फ फिल्म आणि काही टीव्ही कमर्शिअरमध्येही काम केले आहे.