संविधानावर ‘चाणक्य’चे एन्काउंटर -प्रकाश राज

0

बंगळुरु – काँग्रेस आणि जेडिएस आघाडीचे ११६ चे संख्याबळ डावलून कर्नाटक विधानसभेत राज्यपालांनी १०४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेची संधी दिली. यावर दक्षिणेतील अभिनेता प्रकाश राज यांनी ट्विट करत टीका केली आहे. प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की ‘कर्नाटकमधून संविधानावर एन्काउंटर सुरू झाले आहे.

या सर्व घडामोडीचा सर्वसामान्य जनतेला मागमूस नाही. सर्वसामन्य नागरिकांची याबाबतीत कोणतीही तक्रार नाही. कोणी कोठे उडी मारली याची ब्रेकींग न्यूज येत आहे….सुंदर रिसॉर्टच्या एक्सक्लिझिव्ह छायाचित्रात कायदा बनविणारे कैद झाले आहेत. तेथे चाणक्यनिती व इतरजण काम करत आहे. सर्वत्र आनंदी-आनंद आहे.’