पाळधी गावात मिळणार फिल्टरचे पाणी

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून वाचनपूर्ती

पाळधी, ता.धरणगाव – पाळधी खुर्द व बुद्रुक या गावांना फिल्टरचे शुद्ध पाणी नळांद्वारे उपलब्ध होणार आहे. आपली कर्मभूमी असलेल्या गावातील गावकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची वचनपूर्ती यानिमित्त जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

शुद्ध जल संचय विहीर व पंप हाऊसचा हा प्रकल्प पाळधी येथे कार्यान्वीत झाला आहे. या प्रकल्पाची पाणी साठवणूक क्षमता ६ लाख २५ हजार लिटर्स आहे. २३ जानेवारीपासून प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. जानेवारी महिन्यात पाळधी खुर्द आणि बुद्रुक गावात शुद्ध पाणी देण्याचे वचन मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले होते. ना.पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या नव्या प्रकल्पाची पाहणी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी केली. प्रकल्पाच्या सर्व तांत्रिक बाबींची पाहणी केल्यानंतर प्रकल्प पुर्ण क्षमतेने काम करीत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रताप पाटील यांच्यासोबत शेतकी संघाचे संचालक संजय पाटील, लिपीक शिवाजी पाटील, शुभम पाटील, राजेंद्र चौधरी, गणेश माळी, संजय कुमावत, अजय पाटील उपस्थित होते. या प्रकल्पामुळे यापुढे पाळधी गावात शुद्ध पाणी मिळणार असल्याने गावकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.