यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील किनगाव येथील राहणारा व तिन दिवसापुर्वी तापी पुलावरून उडी घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह अजाळे शिवारातिल मोर नदीच्या पात्रात सापडला . या संदर्भातील मिळालेली माहिती अशी की शेख अय्युब शेख ग्यास वय ३८ वर्ष राहणार किनगाव तालुका यावल या तरूणाने संतापाच्या भरात दिनांक ३ ऑगस्ट शुक्रवार रोजी सुमारे १ते २ वाजेच्या सुमारास आपली मोटरसायकल तापीवर उभी करून त्याने तापी नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची माहीती प्रत्यक्षदर्शक एका महिलेने पाहील्याचे सांगण्यात येत आहे . सदरच्या घटनेची माहिती मिळाल्यापासुन मागील तिन दिवसा पासुन आत्महत्या केलेल्या तरूणाचा पोहणाऱ्या कडुन त्याचा मृतदेहाचे शोध घेण्याच्या कार्यात लागले होते परंतु पावसाळ्यात वाढलेल्या नदीचा वाढत्या पाण्या मुळे शोध कार्यात अनेक अडचणी येत होत्या, अखेर आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी दुपारी वाजेच्या सुमारास अंजाळे शिवारातील मोर नदीच्या पात्रात तरुणाचे प्रेत हे आढळुन आले आहे . मयत शेख अय्युब शेख ग्यास हा आपले आई ,वडील ,पत्नी ,एक वर्षाची मुलगी, एक भाऊ,चार बहीणी अशा परिवारा सोबत राहात होता . शेख अय्युब हा गावात पानटपरीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता अत्यंत चांगल्या व मनमिळावु स्वभावाचा असल्याने त्याच्या अशा दुदैवी मृत्युने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .