मुंबई l बँकांची बँक अशी ओळख असलेल्या रिझर्व्ह बँकेने आज २ हजार रुपयांच्या नोटेबाबत मोठी घोषणा केली आहे. देशात ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर २ हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली होती. तेव्हापासूनच २ हजार रुपयांच्या नोटेबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. अखेर आज रिझर्व्ह बँकेने घोषणा केली की, २ हजार रुपयांच्या नोटा आता चलनात आणू नयेत.
रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आदेश दिला आहे की, बँकांनी २ हजार रुपयांची नोट ग्राहकांना देऊ नये. ती चलनात आणू नये. येत्या २३ मे पासून २ हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून मिळणार आहेत. जास्तीत जास्त २० हजार रुपयांपर्यंतच्या २ हजाराच्या नोटा या बँकेतून बदलून मिळू शकतील, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. येत्या ३० सप्टेंबर पर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत. म्हणजेच, ३० सप्टेंबर पर्यंत २ हजार रुपयांच्या वैध असतील. त्यापुढे त्या अवैध असतील, असे बँकेने स्पष्ट केले आहे.