अखेर ‘रेस-3’ ट्रेलर रिलीजची तारीख ठरली!

0

नवी दिल्ली- सलमान खानने रेस 3 या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजबाबत घोषणा केली आहे. या चित्रपटाचा पोस्टर देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात सलमान खान, अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडिस, बॉबी देओल, साकिब सलीम आणि डेसी शाह दिसत आहे. रेमो डिसुझा हे या चित्रपटाचे निर्माते आहे. चित्रपटच्या ट्रेलर रिलीज करण्याबाबत खूप विचार केला असून अखेर तारीख निश्चित करण्यात आली आहे. १५ मे रोजी रेस 3 ट्रेलर रिलीज होणार आहे. सलमान खानने याबाबत अधिकृतरीत्या ट्वीट केले आहे.

सलमानचे ट्वीट

सलमान खान आपल्या ट्विटर हँडलवर “सच बतावू , हम रेस 3 ट्रेलर बनाने की तैयारी मी नही थे! पोस्टर बनाया है, जरा सब्र किजीये इंतजार का फल मिठा होता है! असे सांगितले आहे.