नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण अरुण जेटली किडनी संबंधी आजारावर उपचार घेण्यासाठी अमेरिकेला गेले आहे. १४ में २०१८ ला जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. मागील वर्षी त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागली. जेटली यांचा पदभार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सोपविण्यात आले होते.
अर्थमंत्री अरुण जेटली यांना यावर्षी मोदी सरकारचा शेवटचा हंगामी अर्थसंकल्प फेब्रुवारीमध्ये सादर करावयाचा आहे.