नवी दिल्ली-मोदी सरकारच्या शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प आज प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल मांडत आहे. यावेळी बोलतांना त्यांनी पाच वर्षात सरकारने केलेल्या कामगिरींचा आढावा घेतला. पाच वर्षात सरकारने महागाई कमी केली. सामन्यांचे कंबरडे मोडणाऱ्या महागाईचीच कंबरडे मोडण्याची कामगिरी आमच्या सरकारने केली आहे असे पीयूष गोयल यांनी यावेळी सांगितले.
भारताला प्रगती पथावर आणण्याची कामगिरी सरकारने केली. २०२२ पर्यंत न्यू इंडिया साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्वच्छ व स्वस्थ भारतसाठी आमच्या सरकारने काम केले आहे असे गोयल यांनी यावेळी भाषण करतांना सांगितले.
आज भारताच्या अर्थव्यवस्थेचे स्थान जगातील ६ व्या स्थानी आहे. जे ११ व्या स्थानी होते.