पीएमसी बँकेच्या खातेधारकांचा केंद्रीय अर्थमंत्र्यांना घेराव

0

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मुंबई आल्या आहेत. यावेळी भाजपा कार्यालयात जातांना पंजाब महाराष्ट्र बँकेच्या खातेधारकांनी अर्थमंत्र्यांना घेराव घेतला. आर्थिक अनियमितता असल्याने रिझर्व्ह बँकने पीएमसी बँकेवर निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध उठवण्याच्या मागणीसाठी बँकेच्या खातेधारकांनी अर्थमंत्र्यांना घेराव घालत भाजपा कार्सयालयासमोर आंदोलन केले.

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सरकारने पंजाब महाराष्ट्र बँकेतून रोकड काढण्यास निर्बंध घातले. त्यामुळे अनेक ग्राहकांचा संताप झाला. निर्बंध घातल्यापासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झालीत, सरकारवर आरोप झाले. मात्र अद्यापही निर्बंध कायम आहे.

पीएमसी बँकेच्या घोटाळ्याशी केंद्राचा संबंध नाही

पीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही. या बँकेच्या खातेदारांनी माझ्यासमोर आंदोलन केले. लुटारुंनी बँक लुटली आता खातेदारांचे काय हा प्रश्न निश्चितपणे महत्त्वाचा आहे. या खातेदारांचा आवाज मी आरबीआयच्या गव्हर्नरपर्यंत पोहचवेन असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या भाजपा कार्यालयात दाखल झाल्या त्यावेळी त्यांच्यासमोर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी त्यांच्यासमोर आंदोलन केलं आणि आमचे पैसे आम्हाला परत द्या अशी मागणी केली. मात्र या घोटाळ्याशी केंद्र सरकारचा संबंध नाही असं सीतारामन यांनी म्हटले आहे.