नवी दिल्लीः संसदेचे अधिवेशन संपले आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्रिमंडळातील नेते कामाला लागले आहे. दरम्यान आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रतिनिधी आणि गृह खरेदीदारांसोबत बैठक झाली. या बैठकीत अर्थमंत्री रिअल इस्टेट क्षेत्रातील उद्योजकांना येणाऱ्या अडचणी आणि समस्यांबाबत चर्चा केली. जीएसटी आणि नोटबंदीनंतर रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मंदी आली आहे. हळूहळू आता परीस्थिती सुधरत आहे, याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री रिअल इस्टेट क्षेत्रातील उद्योजकांशी चर्चा केली.