प्लास्टिक आवरण असलेल्या खाद्यपदार्थाचा साठा संपवा

0

नवी दिल्ली-राज्य सरकारकडून गुढीपाडव्यापासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. त्याची अंमलबजावणी मध्य रेल्वेनेही करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात स्टॉलधारकांशी झालेल्या बैठकीत तीन महिन्यात प्लास्टिक आवरण असलेल्या खाद्यपदार्थाचा साठा संपवा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून स्टॉलधारकांना करण्यात आले आहे. मोठय़ा प्रमाणात नवीन खाद्यपदार्थ घेताना कागदाचा वापर असलेले खाद्यपदार्थ घ्या, असेही बैठकीत स्पष्ट केले. या आवाहनाला प्रतिसाद देत त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन स्टॉलधारकांनी दिले आहे.

प्लास्टिक प्लेट, ग्लास, पिशवीतून खाद्यपदार्थ प्रवाशांना दिले जातात आणि हेच रुळांवरही टाकले जातात. तसेच साध्या प्लास्टिकबंद असलेले खाद्यपदार्थही विक्री केले जातात. यावर पूर्णपणे बंदी आणण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.