नवी दिल्ली: येथील रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या चंदीगड-कोचुवेली एक्सप्रेसच्या मागील पॉवर कारला भीषण आग लागली आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. सर्व प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या ८ व्या प्लॅटफॉर्मही आग लागली. अग्निशामक दलाला घटना स्थळी प्रचारण करण्यात आले आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.