भुसावळ प्रतिनिधी |
भुसावळ शहराचे तापमान 46 अंशावर पोहोचल्यानंतर वैशाख वणवा पेटल्याची अनुभूती येत असताना शहरात वेगवेगळ्या दोन घटनेत आग लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. शनिवारी दुपारी आगाखान वाड्यातील साजीद खान यांच्या घरात स्वयंपाक सुरू असतांना सिलिंडर पेटताच आग लागली. नागरीकांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली. यावेळी पालिकेच्या
अग्निशमन केंद्राच्या बंबाला वेळीच पाचारण करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. शनिवारी रात्री आठच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील लाल चर्चच्या पुढे गवत, झाडे झुडपे पेटल्याने या भागातही आग लागली होती. ही आग पालिकेच्या अग्निशमन केंद्राच्या बंबाने विझवली.यावेळी पालिकेचे कर्मचारी कैलास कोळेकर व फायरमन संजय जावळे आग आटोक्यात आणली.