महिलेच्या दोन्ही पायातून आरपार निघाल्यानंतरही गोळीने तिघांना केले जखमी

0

वरणगाव सेंट्रल बॅकेतील गोळीबार प्रकरण ; भितीने दोन्ही महिलांना भितीने बसला जबर मानसिक धक्का ; दोन्ही पाय कापावे लागणार असल्याची डॉक्टरांची माहिती

जळगाव- वरणगाव येथील सेंट्रल बँकेत सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून लॉक होवून अचानकपणे बाहेर पडलेली गोळी बँकेत पैशांच्या भरणा करुन बाकड्यावर बसलेल्या आलेल्या ग्राहक महिला प्रमिलाबाई वसंत लोहार वय 55 रा. तळवेल ता. मुक्ताईनगर या महिलेच्या दोन्ही पायांमधून आरपार निघाली. यानंतर गोळी शेजारी बसलेल्या शोभा प्रकाश माळी वय 52 रा. वरणगाव यांच्या पायाला चाटून जावून गोळीने आणखी दोन महिला व एका पुरुषाला जखमी केले. प्रमिलाबाई व शोभा या दोघा महिलांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान गोळी दोन्ही पायातून आरपार केल्याने महिलेचे दोन्ही पाय कापावे लागणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. आखो देखी घटनेमुळे जखमी महिला तीन तासानंतर भितीने बसलेल्या मानसिक धक्क्यातच होत्या.

तळवेल येथून प्रमिलाबाई या पैशांचा भरणा करण्यासाठी आल्या होत्या. पैशांचा भरणा करुन त्या बाकड्यावर बसल्या. त्याच्या शेजारी मयत पतीची पेन्शन घेण्यासाठी आलेल्या वरणगाव येथील शोभा माळी बसल्या होत्या. यावेळी अचानक स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. यामुळे नेमके महिलांना काय झाले ते कळाले नाही. थोड्या वेळाने प्रमिलाबाई यांना पायाला दुखापत झाल्यावर कळाले की गोळी लागली. दोन्ही पायातून गोळी आरपार गेल्यामुळे झालेली जखम बघून प्रमिलाबाई बेशुध्द होवून खाली पडल्या. यानंतर गोळी शेजारच्या शोभा माळीच्या या पायाला दुखापत करुन इतर दोन महिला व पुरूषांना लागली. अशी आपबिती जखमी प्रमिलाबाई यांनी बोलतांना सांगितली. अद्यापही घटना आठवली की, अंगावर काटे उभे राहत असल्याचे सांगितले. प्रमिलाबाई ह्या अद्यापही धक्क्यातून सावलेल्या नव्हत्या.

सुरक्षा रक्षकाला मारण्यासाठी नागरिक धावले
गोळी सुटल्यानंतर सुरक्षा रक्षकाला मारण्यासाठी संतप्त नागरिक धावले. मात्र त्यापूर्वी बँकेच्या व्यवस्थापकाने त्याला पकडून कॅबीनमध्ये नेले. त्यामुळे ते वाचले, असेही यावेळी प्रमिलाबाई यांनी सांगितले. जखमी झाल्यानंतर बँकेत रक्ताचा जसा सडाच सांडला होता. जखमी प्रमिलाबाई 30 मिनिटांपर्यत रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. मात्र फोन करुनही रुग्णवाहिका आली नाही, अखेर त्यांना तसेच मला रिक्षातून नागरिकांनी वरणगाव शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचे जखमी शोभा माळी यांनी सांगितले. यावेळी बंदुकीच्या गोळीच्या आवाजाने बँकेत पळापळ होवून गोंधळही उडाल्याचे माळी यांनी सांगितले.