भुसावळ प्रतिनिधी । केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भुसावळ येथे अग्निशमन सेवा सप्ताहनिमित्त दीपनगर अग्निशमन विभाग, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र याच्याकडून विद्यार्थ्यांना आगीपासून संरक्षणाची विविध उपकरणे यांची माहिती व प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर करण्यात आली. प्रत्येक वर्षी १४ एप्रिल ते २० एप्रिल हा सप्ताह अग्निशमन सेवा सत्ता म्हणून दीपनगर अग्निशमन विभाग, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र यांच्यामार्फत साजरा करण्यात येतो. या अग्निशमन सेवा सप्ताहामध्ये परिसरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आगीपासून बचावासाठी विविध उपकरणांची माहिती आणि प्रात्यक्षिक करून दाखवली जातात.
आज या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना आगीचे प्रकार आगीपासून बचावासाठी उपयोगात येणारे विविध उपकरणे यांची माहिती तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आली. तसेच एलपीजी सिलिंडरबद्दल माहिती व दक्षता तसेच अग्निशमन बंबाबद्दल माहिती आणि प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आली. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी प्रत्यक्ष विविध उपकरणांच्या साह्याने आग विझवण्याचे प्रात्यक्षिक केले. या कार्यशाळेसाठी दीपनगर अग्निशमन विभागाचे अमृत वसावे (डेप्युटी चीफ फायर ऑफिसर), ए. एच लंबोडे ( ज्युनियर फायर ऑफिसर) वाय. एस. कचरे (डीसीएफइओ), (फायरमॅन) इत्यादी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतल्याने धन्यवाद मानले.