कमिशन मिळाले नाही म्हणून कॉंग्रेसने राफेल डील होऊ दिली नाही-संरक्षणमंत्री

0

नवी दिल्ली-सध्या देशात राफेल लढाऊ विमान खरेदीवरून सरकार आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप होत आहे. कॉंग्रेसने राफेलच्या चौकशीसाठी जेपीसी नेमण्यात यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान आज संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत निवेदन केले. यावेळी त्यांनी कॉंग्रेसच्या काळात ८ वर्ष फक्त राफेलबाबत चर्चा झाली. या सरकारने राफेल खरेदीबाबत ठोस पाऊले उचलले. येत्या सप्टेंबर महिन्यात एक राफेल विमान संरक्षण दलात दाखल होईल असे सांगितले.

इतर ३५ विमाने २०२२ पर्यंत संरक्षण दलात दाखल होतील असेही सीतारमण यांनी यावेळी सांगितले.

देशाच्या सुरक्षिततेशी प्रतारणा केली जाणार नाही असे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले. भारतावर चहू-बाजूने धोका वाढत आहे. विरोधक हल्ला करण्यासाठी टपून बसले आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

राफेल करार व्हावे अशी यूपीए सरकारची इच्छा नव्हती. कमिशन मिळाले नाही म्हणून ८ वर्ष फक्त चर्चा करण्यात घालविली अशी टीका संरक्षण मंत्र्यांनी केली.