पहिल्याच सामन्यात पृथ्वी शॉची दमदार खेळी

0

राजकोट- इंग्लंड विरुद्ध झालेल्या मानहानिकारक पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ तयार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध ते संपूर्ण ताकदीने मैदानावर उतरणार आहेत. राजकोट येथे आजपासून पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर भारताला पहिला धक्का बसला. लोकेश राहुल शुन्यावर बाद झाला.

या सामन्यातून मुंबईकर पृथ्वी शॉ कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. लोकेश राहुल याच्यासह तो सलामीची जबाबदारी स्वीकारली. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात पृथ्वी शॉने दमदार अर्धशतक ढोकले आहे. पदार्पणाला साजेशी खेळी करून त्याने योग्यता सिद्ध केली आहे. सध्या भारतीय संघाची १०३ /१ अशी अवस्था आहे. पृथ्वी शॉ ६३ वर तर चेतेश्वर पुजारा ४१ वर खेळत आहे.