बोदवड प्रतिनिधी ।
तालुक्यात सलग तीन ते चार दिवसांपासून वादळी वारे, विजा व ढगांच्या गडगडाटात पाऊस होत आहे. मंगळवारी दुपारी ३.३० ते ४ वाजेच्या सुमारास करंजी येथे वादळ आले. त्यात पाच देवळी शिवारातील पुरुषोत्तम जानकीराम पाटील यांच्या शेतातील (गट क्रमांक ६९) झाल्याने जळून खाक झाल्याची घटना घडली. याच घटनेत ठिबक नळ्या देखील जळुन खाक झाल्या. त्यामुळे मका व ठिबक नळ्या मिळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे
वीज वाहिनीचे तार खाली असल्याने शॉर्टसर्किट होऊन हाता-तोंडाशी आलेला मका जळून खाक झाल्याचे समजते. त्यामुळे शेतकरी पाटील यांनी नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी केली. करंजी पाच देवळी येथील शेतकरी घटनास्थळी उपस्थित होत. करंजीत येथील शिंदे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. कृषी सहाय्यक सुदर्शन शिंदे हेही उपस्थित होते. राष्ट्रवादीचे रामदास पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली. शॉर्टसर्किट वादळामुळे झाल्याने पंचनाम्यासाठी वीज महावितरणचे अधिकारी उपस्थित असणे गरजेचे होते पण ते कोणीही हजर नसल्याने पंचनामा होऊ शकला नाही.