नवी दिल्ली :– देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग १६ व्या दिवशी वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलीटर ८६.२४ रुपये आहे. तर डिझेल ७३. ७९ रुपये प्रतिलीटरवर जाऊन पोहोचले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ रोखण्यात आली होती. मात्र कर्नाटकमध्ये मतदान होताच पेट्रोल, डिझेलची दरवाढ पुन्हा सुरु झाली. या सततच्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य हैराण असून त्यांचे बजेट कोलमडले आहे. मात्र, जगाच्या पाठीवर असेही काही देश आहे जिथे पेट्रोल हे भारतापेक्षाही कित्येक पटींनी महाग आहे. पाहूया कोणत्या देशामध्ये इंधनदरवाढ जास्त आहे.
हे देखील वाचा
या पाच देशांमध्ये आहे इंधनदरवाढ
हाँगकाँगमध्ये पेट्रोलच्या किंमती या जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याने येथील पेट्रोल १४३. ४५ पैसे प्रतिलिटर प्रमाणे आहे. ‘द चायना नॅशनल ऑफशोअर ऑइल कॉर्पोरेशन’ येथे पेट्रोलचे दर ठरवते. देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आइसलँड हा देश आहे. २१ मे २०१८ रोजी या देशात पेट्रोलची किंमत १४१. ९४ पैसे प्रतिलीटर होती. तिसऱ्या क्रमांकावर नॉर्वे आहे. येथे पेट्रोलसाठी १३६.७९ रुपये प्रतिलीटर मोजावे लागतात. नॉर्वे सर्वाधिक पेट्रोलचे दर असलेल्या यादीत आहे. चौथ्या क्रमांकावर नेदरलँड आहे. याठिकाणी गेल्या आठवड्यात पेट्रोलचे प्रतिलीटर दर हे १३१.३३ रुपये होते. सध्या येथे पेट्रोल डिझेल कारपेक्षा इलेक्ट्रीक कारनां जास्त पसंती मिळताना दिसत आहे. आणि पाचव्या क्रमांकावर डेन्मार्क आहे. इतर युरोपियन देशांपेक्षा डेन्मार्कमध्ये पेट्रोलच्या किंमती अधिक आहेत. येथे गेल्याआठवड्यातील पेट्रोलचा दर हा प्रतिलीटर १२९. ७८ रुपये होता. इंधनच्या वाढत्या किंमतीमुळे इथेही इलेक्ट्रीक कारचा खप वाढत चालला आहे.